Fraud loan app | लोन ॲप की मृत्यूचे सापळे ?

5/5 - (5 votes)

व्यक्ती एखाद्या संकटात सापडला तर तो मानसिक तणावाखाली जातो आणि कोणताही संयमी विचार न करता संकट सोडविण्याचा प्रयत्न करत असतो. सर्वात महत्त्वाचे संकट म्हणजे कर्ज. एक कर्ज फेडण्यासाठी व्यक्ती मिळेल त्या मार्गाचा शोध सुरू करतो. त्यानंतर मार्ग मिळतो तो ऑनलाईन लोन ॲपचा. देशात अनेक Fraud loan app तयार झाले आहेत. परंतु हे संकट सोडविण्याचा मार्ग नसून येथूनच व्यक्तीच्या मृत्यूची वाट तयार होते. देशात शेकडो जणांनी या Fraud loan app च्या जाळ्यात येऊन आत्महत्या केल्या आहेत. यातील काही प्रकरणाची पोलिसांकडे नोंद आहे. तर काही प्रकरणांची अद्यापही नोंद झालेली नाही. भारतीय व्यक्ती समाजातील बदनामीला सर्वाधिक घाबरत असतो. हेच हेरून या कंपन्या त्या व्यक्तीच्या छायाचित्र अर्थात फोटोमध्ये छेडछाड करून त्याची नग्न चित्रफिती तयार करतात. हे खोटे चित्रीकरण त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना कंपनी पाठविण्यास सुरूवात करते. त्यामुळे या आत्महत्या होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

काय आहे Fraud loan app

करोनानंतर अनेकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले होते. अनेकांनी नोकऱ्या गमावल्या. तर काहींचे उद्योगधंदे पूर्णपणे बंद झाले. यातील अनेकांच्या डोक्यावर लाखो, हजारो रुपयांची कर्जे होती. आता ही कर्जे फोडण्यासाठी नागरिक ऑनलाईन कर्ज उपलब्ध होते का याचा शोध घेऊ लागले. त्यामुळे काही ऑनलाईन कर्ज पुरवठा करणाऱया Fraud loan app, वेबसाईट तयार झाल्या आणि या गुन्ह्यांना सुरूवात झाली.

Fraud loan app

लोन ॲपच्या जाळ्यात का अडकतात

  • एखाद्या व्यक्तीने बँकेकडून किंवा इतर अर्थ, वित्त पुरवठा करणाऱया कंपन्यांकडून कर्ज घेतले असल्यास तिथे विविध कागदपत्र, गॅरंटर, घराची कागदपत्रे, कंपनीत काम करतानाचे वेतन पावती अर्थात सॅलरी स्लीप किंवा उत्पन्नाच्या स्त्रोताविषयीची माहिती जमा करावी लागते. ही प्रक्रिया अंत्यत किचकट, वेळखावू असते.
  • तर दुसरीकडे या Fraud loan app चे एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपली काही खासगी माहिती, ओळखीच्यांचे मोबाईल क्रमांक द्यावे लागतात. इतर कोणतेही पुरावे या कंपन्या मागत नाही. त्यामुळे नागरिक लोन ॲपकडे आकर्षित होत असतात.

कशी होते फसवणूक

  • समजा, तुम्हाला काही पैशांची गरज आहे. तुम्हाला लोन ॲप किंवा वेबसाईट निदर्शनास आल्यास तुम्ही तात्काळ ते ॲप डाऊनलोड करता. किंवा वेबसाईटवर वैयक्तिक माहिती देता. ॲप डाऊनलोड करताच तुमच्या मोबाईलचा तपशील, तुमची वैयक्तिक माहिती कंपनीकडे जाते आणि तुमच्या अस्ताला सुरूवात होते. तुम्ही या लोन ॲपमधून 20 ते 25 हजार रुपयांचे कर्ज काढल्यास हे पैसे फेडण्यासाठी तुम्हाला अवघ्या एक ते दोन आठवड्यांची मुदत दिली जाते. त्यावरील व्याज हे तब्बल 30 टक्क्यांच्या घरात असते. इतक्या कमी मुदतीत संबंधित व्यक्ती पैसे फेडण्याचा प्रयत्न करतो. पंरतु व्याजाच्या रकमेमुळे कर्ज फेडताना नाकी नऊ येतात. व्याज 30 टक्क्यांपर्यंत आहे हे कर्ज घेणाऱ्याला अनेकदा माहितीही नसते. {Fraud loan app}
Fraud loan app

कर्ज घेतल्यानंतर काय होते

  • समजा तुम्ही कर्ज घेतले आणि वेळेत व्याजासह ते फेडणे अशक्य झाले. तर तुम्हाला एकदिवस अचानक संबंधित Fraud loan app कंपनीचे कर्मचारी संपर्क साधण्यास सुरूवात करतात. अत्यंत शिवराळ भाषा त्यांच्याकडून वापरली जाते. आई, बहीण घरातील महिलांच्या बाबतीत शिव्या दिल्या जातात.
  • त्यानंतर पुन्हा तुम्हाला संपर्क साधला जातो. त्यात थेट धमकी दिली जाते. तुमचे छायाचित्र वापरून ते क्राॅप केले जाते. एखाद्या पोर्न किंवा अश्लिल चित्रीकरणात तुमचा फोटो वापरला जातो. हे फिल्म तुम्हाला whatsApp क्रमांकावर पाठविली जाते.
  • watch also https://www.youtube.com/watch?v=KkYqQVhSpcs

नातेवाईकांना संपर्क

  • काही दिवसांनी नातेवाईकांना संपर्क साधला जातो. त्या नातेवाईकांनाही धमकावले जाते. तसेच त्यांच्या कुटुंबियांची बदनामी करण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे तुम्ही आणखी मानसिक तणावात येता. काही दिवसांनी याच नातेवाईकांना तुमची बनावट छायाचित्र पाठविले जाते. अशा प्रकारामुळे अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत.
Fraud loan app

काय करावे.

  • तुम्हाला तात्काळ लोन कुठे मिळत असेल तर सुरुवातीला त्याची सत्यता तपासा.
  • कोणीही असे तात्काळ लोन देण्यास बसलेले नाही. तुमची फसवणूक करणे हाच त्यांचा मुळ हेतू असतो.
  • एखाद्या वेळी तुम्ही कर्ज घेतले असल्यास ते फेडण्यासाठी तुमच्या कडे पुरेसे पैसे शिल्लक राहत नसतील. तर वेगवेगळे मार्ग तपासा. कंपनीत प्रमोशन, वेतन वाढ होईल असे काम करा. तुमच्या कला गुणांतून फ्रिलांसिंग करून पैसे कमवीता येतील का याची चाचपणी करा.
  • युट्यूब, इन्स्टाग्रामचा वापर करून तुमचे अकाऊंट तयार करून त्यावर मेहनत घ्या. त्यावर क्वालीटी कंटेट दिल्यास, चांगले काम केल्यास आणि त्यामध्ये सातत्य ठेवल्यास नक्की तुम्हाला काही महिन्यांत यश मिळू शकेल.

Read AlsoWhatsApp backup from Android to iPhone

FAQ

लोन ॲपमधून कर्ज घ्यावे का ?

– अजिबात घेऊ नका. हे ॲप तात्काळ कर्जाच्या नावाखाली तुमच्या मृत्यूचा सापळा तयार करत असतात.

लोन ॲपमुळे आत्महत्या का होतात ?

लोन डाऊनलोड केल्यानंतर आपल्या मोबाईलमधील माहिती चोरली जाते. त्यानंतर तुमच्या मोबाईलमधला सर्व डेटा, तुम्ही सर्वात जास्त कोणाच्या संपर्कात आहात, तुमची छायाचित्र या सर्वांचा अॅक्सेस त्यांना मिळतो. याचा वापर करून ते तुम्हाला धमकावतात.

लोन ॲपमध्ये फसवणूक झाल्यावर काय करावे ?

तुम्हाला लोन ॲपमधून संपर्क साधून धमकावले जात असल्यास थेट नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधा. पोलीस आणि सरकार या प्रकरणात तुम्हाला सहकार्य करतील. चुकूनही आत्महत्येचे पाऊल उचलू नका. कारण तु्म्ही आत्महत्या करून काहीही साध्य होणार नाही. सर्वाधिक त्रास तुमच्या आई-वडिल, पत्नी, मुला-बाळांना होईल.

निष्कर्ष

  • Fraud loan app हे एक मायाजाल आहे. आतापर्यंत सरकारने अशा ॲपवर नियंत्रण मिळविण्यासाठी अनेक प्रयत्न केले. परंतु ते शक्य होणार नाही. कारण यांचे मास्टर माईंट चीन देशात असण्याची शक्यता आहे. येथून आरोपींना पकडून आणणे कधीही शक्य होणार नाही.

Leave a Comment