पत्रकार टीव्ही चॅनल सोडून युट्युबर का बनत आहेत?

5/5 - (8 votes)
  • [पत्रकार टीव्ही चॅनल सोडून युट्युबर का बनत आहेत?] लोकशाहीचा चौथा स्थंभ म्हणून माध्यमांना ओळखले जाते. परंतु मागील आठ ते दहा वर्षांमध्ये अनेक पत्रकारांना कंपन्यांनी त्रास देऊन राजीनामा देण्यास भाग पाडले. तर काही जणांनी स्वतःहून राजीनामा दिला. यामध्ये वरिष्ठ पत्रकार रविश कुमार निखील वागळे पासून ते सध्याच्या पिढीचा सोहित मिश्रा यांचा सामावेश आहे. गेल्याकाही दिवसांपासून अनेक चॅनलमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले आहे. बहुतांश पत्रकार सरकारचा दबाव आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आल्याने राजीनामा देत असल्याची चर्चा आहे. वयाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असताना अचानक अनेक पत्रकारांना नोकरी सोडावी लागत आहे. घराचा गाडा कसा चालवावा अशी परिस्थिती असताना त्यांच्या कुटुंबियांनी त्यायांना मोठा आधार दिला. या खऱ्या पत्रकारांनी आता समाजमाध्यमाचे नवे अस्त्र वापरण्यास सुरूवात केली आहे. बहुतांश पत्रकार आता युट्युब चॅलनकडे वळाले आहे. या सर्वांना नागरिकांच्या चांगल्या वाईट प्रतिक्रिया देखील मिळत आहे. भविष्यात युट्युब चॅनल हा एक नवा स्पर्धक देखील तथागतीत टीव्ही माध्यमांसमोर उभा राहणार आहे.
पत्रकार टीव्ही चॅनल सोडून युट्युबर का बनत आहेत

अशी परिस्थिती का आली

सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी 2011 मध्ये इंडिया अगेन्स्ट करप्शन ही मोहीम हाती घेतली होती. देशात अनेक वर्ष सत्तेत असणाऱ्या काँग्रेस पक्षाविषयी या कालावधीत जनतेमध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झाला होता. त्याचाच फायदा घेत अण्णा हजारे यांनी ही मोहीम हाती घेतली होती. सुरुवातीच्या कालावधीत या मोहीमेत मंचावर सामाजिक कार्यकर्ते दिसत होते. या मोहीमेत संपूर्ण देश ढवळून निघाला होता. काँग्रेस आणि भ्रष्टाचारा विरोधात नागरिक मेणबत्त्या घेऊन मोर्चे काढू लागले होते. हळूहळू सध्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, भाजपशी अप्रत्यक्ष संबंधीत असणारे रामदेव बाबा, सध्या भाजपमध्ये असलेल्या आणि एका छोट्या राज्याच्या राज्यपाल म्हणून काम करणाऱ्या किरण बेदी यांसारखे लोक या आंदोलनात दिसू लागले.

माध्यमांनी हे प्रकरण खूपच उचलून धरले होते. वृत्तपत्र, टीव्ही चॅनेलवर मोठ-मोठ्या बातम्या चालविल्या जात होत्या. 2014 मध्ये लोकसभेच्या निवडणूका आल्या आणि या निवडणूकांमध्ये काँग्रेसला दारूण पराभव पत्करावा लागला. मोदी यांच्या करिष्म्याची चर्चा त्यावेळी होत होती. परंतु इंडिया अगेन्स्ट करप्शन या मोहिमामुळे देखील भाजपला सत्तेत येण्यास मदत झाल्याची चर्चा आजही होते.

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपची सत्ता आली. मोदी यांनी भाजपवर मजबूत पकड बनविली. भाजपचे जेष्ठ नेते व्यासपीठावरून गायब झाले. दुसरीकडे भ्रष्टाचाराविषयी आरोप करणारे हजारे राळेगणमध्ये जाऊन शांत बसले. नव्याने भाजपत प्रवेश होऊ लागलेल्यांना पाठिंबा मिळाला आणि नव्या भाजपचा उदय झाला. या उदयासोबतच माध्यमांत मात्र कमालीची अस्वस्थता पसरली आहे. अनेक संपादकांना सत्ताधीशांविरोधी बातम्या केल्यानंतर अचानक राजीनाम्यासाठी दबाव येऊ लागले. ज्यांनी मालकांचे ऐकले  ते टिकले. परंतु ज्यांनी नांग्या टाकल्या नाही त्यांना घरचा रस्ता पत्करावा लागला. त्यानंतर एकामागून एक मोठ्या संपादकांची, पत्रकारांची मोठ्या वाहिन्यातून गळती होऊ लागली. महाराष्ट्रातही अनेक संपादक, वृत्तनिवेदक, रिपोर्टर यांना आपली नोकरी गमवावी लागली. [पत्रकार टीव्ही चॅनल सोडून युट्युबर का बनत आहेत?]

कोणत्या दिग्गजांनी नोकरी गमावली किंवा कंपन्यांना राम-राम ठोकला

1) निखील वागळे

– महाराष्ट्रातील काही मोजक्या वरिष्ठ पत्रकारांमध्ये निखील वागळे यांचे नाव घेतले जाते. आयबीएन लोकमत या चॅनलवर संपादक म्हणून काम करताना त्यांचे आजचा सवाल, रिपोर्टाज, ग्रेट भेट यांसारखे कार्यक्रम त्याकाळी गाजले होते. वागळे हे पूर्वी आपले महानगर या वृत्तपत्राचे संपादक होते. त्यावेळी आपले महानगर या वृत्तपत्रालाही त्यांनी जिवंत ठेवले होते.  2014 मध्ये सरकार बदलल्यानंतर वागळे यांना काही वर्षांतच राजीनामा द्यावा लागला. काहीकाळ त्यांनी मी मराठी या चॅनेलवर काम केले. परंतु ते channel बंद पडले. त्यानंतर काही महिने त्यांनी मुक्त पत्रकार म्हणजेच, फ्रिलान्सर  म्हणून काम केले.  सध्या त्यांनी निखील वागळे ओरिजनल हे चॅनेल युटयुब channel सुरू केले आहे. ते प्रचंड गाजत आहे.

पत्रकार टीव्ही चॅनल सोडून युट्युबर का बनत आहेत?

Also Watch https://www.youtube.com/watch?v=Csxep9yeg0Y

2) दिपक शर्मा

 दिपक शर्मा हे शोध पत्रकार म्हणून ओळखले जातात. सप्टेंबर 2020 मध्ये, दीपक शर्मा यांनी देखील स्वतःचे YouTube चॅनल सुरू केले.  ज्याचे आतापर्यंत सुमारे २० लाख सबस्क्राईबर आहेत. शर्मा यांनी 1992 पासून दूरदर्शनच्या बातम्यांमध्ये काम केले आहे आणि कुख्यात underworld गुन्हेगारांच्या मुलाखतींसह अनेक महत्त्वाच्या बातम्या जनतेसमोर आणल्या. दीपक म्हणतात की टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना त्याच्या न्यूज, कल्पना  संपादकांची आवड निर्माण करू शकल्या नाहीत. तेव्हा निराश वाटू लागले. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. दिपक शर्मा यांनी सुरूवातीला एक वेबसाईट सुरू केली होती. परंतु त्यांना त्यातून नागरिकांपर्यंत पोहचता आले नाही. त्यामुळे त्यांनी युट्युब चॅनेल सुरू केला.

पत्रकार टीव्ही चॅनल सोडून युट्युबर का बनत आहेत?
(उजवीकडून पहिले दीपक शर्मा)

Also Watch https://www.youtube.com/watch?v=TNFJWzC5LHs

३) प्रशांत कदम

एबीपी माझा या मराठी न्यूज चॅनेलमध्ये प्रशांत कदम हे दिल्लीचे प्रतिनिधी म्हणून काम करत होते. सर्वोच्च न्यायालय अर्थात सुप्रिम कोर्टाचे आदेश, सुनावणी याबाबत अत्यंत सोप्या भाषेत ते सांगत असे. त्यांची बातमी सांगण्याची, रिपोर्टिंगची शैली देखील अत्यंत साधी होती. इतर रिपोर्टर प्रमाणे ते बातमी सांगताना कोणताही आव आणत नाहीत. त्यांचे मराठी उच्चार अत्यंत स्पष्ट असत. आता त्यांनी प्रशांत कदम नावाने चॅनेल सुरू केले आहे. अवघ्या काही दिवसांत त्यांचे 50 हजारहून अधिक सबस्क्राईबर झाले. 2007 पासून ते न्यूज चॅनेलमध्ये काम करत होते. सुरुवातीला मुंबईत काम केल्यानंतर त्यांनी दिल्लीमध्ये कामाला सुरूवात केली. ज्या पत्रकारीतेवर विश्वास आहे, ती पत्रकारीता करायला मिळावी म्हणून नवी वाट निवडल्याचे ते सांगतात.

पत्रकार टीव्ही चॅनल सोडून युट्युबर का बनत आहेत?

Also Watch https://www.youtube.com/watch?v=5rAyMVVV5Zc

4) संकेत उपाध्याय, सौरभ शुक्ला आणि सुनील सैनी

– सकेंत उपाध्याय, सुनील सैनी आणि सौरभ शुक्ला ही एनडीटीवी इंडिया या न्यूज चॅनेलमधील महत्त्वाची नावे. त्यांनी मिळून “द रेड माईक” हा चॅनेल सुरू केला आहे. अवघ्या आठवड्याभरात या चॅनेलला दीड लाखाहून अधिक सबस्क्राईबर मिळाले आहे. अनेक वर्ष त्यांनी एनडीटीव्हीमध्ये काम केले होते. एनडीटीव्ही इंडिया या  न्यूज चॅनेलचा एक वेगळा इतिहास आहे. अत्यंत विचारपूर्वक, संयमी भाषेत या न्यूज चॅनेलमध्ये वार्तांकन केले जाते. इतर चॅनेलप्रमाणे या चॅनेलवर आरडा-ओरड नसतो. शोध पत्रकारिता हे या चॅनेलचे मूळ धोरण होते. परंतु अदानी कंपनीच्या आगमनानंतर चॅनेलमध्ये गळती सुरू झाली. अनेकांनी राजीनामे दिले. त्यापैकी संकेत, सुनील सैनी आणि सौरभ शुक्ला हे तिघे देखील आहेत.

पत्रकार टीव्ही चॅनल सोडून युट्युबर का बनत आहेत?

Also Watch https://www.youtube.com/@TheRedMike.

  • सौरभ शुक्ला यांना गेल्यावर्षी “इंडियन प्रेस इन्स्टिट्युट” तर्फे गौरविण्यात आले होते. 2021 मध्ये त्यांनी हरिद्वार येथे एका कार्यक्रमात धार्मिक वाद भडकविणारे काही वक्तव्यांचे चित्रीकरण केले होते. तसेच काहीजणांच्या मुलाखती घेऊन त्या वक्त्यांचा पर्दाफाश केला होता. या प्रकारानंतर त्या वक्त्यांना अटकही झाली होती. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती उदय लळीत यांच्या हस्ते सौरभला गौरविण्यात आले होते. यासह त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त आहेत.
  • संकेत उपाध्याय – यांनी 2002 मध्ये ‘इंडो एशियन न्यूज सर्व्हिस’ (IANS) सह newspaper मध्ये पत्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ‘हिंदुस्तान टाइम्स’ या वृत्तपत्रात रुजू झाले. तेथे त्यांनी सुमारे दोन वर्षे सिटी रिपोर्टर म्हणून काम केले. त्यानंतर  बीबीसी पासून अनेक न्यूज चॅनेलमध्ये काम केले आहे. त्यांचे वडिल मोठे पत्रकार होते. तसेच त्यांच्या पत्नीही एका न्यूज चॅनेलमध्ये काम करतात. संकेत उपाध्याय हे संयमी पत्रकार म्हणून ओळखले जातात.
  • सुनील सैनी- सुनील सैनी यांना मीडियामध्ये काम करण्याचा जवळपास तीन दशकांचा अनुभव आहे. ‘एनडीटीव्ही’पूर्वी त्यांनी ‘स्टार टीव्ही नेटवर्क’, ‘आजतक’ आणि ‘झी मीडिया’मध्येही काम केले होते.

5) सोहित मिश्रा

सोहित यांनी 1 सप्टेंबर रोजी राजीनामा सुपूर्द केला. ते एनडीटीव्हीचे मुंबई प्रभारी ब्युरो चीफ म्हणून कार्यरत होते. सोहित मिश्रा 2017 पासून एनडीटीव्हीत काम करत होते. त्यांनी आपल्या टीवी पत्रकारितेची सुरुवात NDTV India मधून केली आणि गेली सहा वर्षे त्यांनी सामाजिक, आर्थिक, राजकारण इत्यादींशी संबंधित विविध विषय कव्हर केले आहे. करोना काळात त्यांनी मजुरांच्या स्थलांतराविषयी अनेक बातम्या केल्या होत्या. न्यूज चॅनेल सोडल्यानंतर त्यांनी एनडीटीव्ही कंपनीच्या प्रशासनावर अनेक गंभीर आरोप केले. मुंबईमध्ये राहुल गांधी यांच्या काॅन्फरन्समध्ये वेगळा प्रश्न विचारून गोंधळ घालण्यासाठी चॅनेलने सांगितल्याचा आरोप हा त्यापैकी एक आऱोप आहे. त्यांनी सध्या “सोहित मिश्रा ऑफिशिलय” हा चॅनेल सुरू केला आहे.

पत्रकार टीव्ही चॅनल सोडून युट्युबर का बनत आहेत?

Also Watch https://www.youtube.com/@JournalistSohitMishra

6) रविश कुमार

रविश कुमार हे हिंदी वृत्तवाहिन्यांमध्ये सर्वात वरच्या स्थानातील संपादक म्हणून ओळखले जाते. पत्रकारितेतील रामनाथ गोयंका पुरस्कार हा सर्वोत्कृष्ट पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. रविश कुमार यांची पत्रकारीता नव्याने पत्रकारिता करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक आदर्श उदाहरण आहे. एनडीटीव्हीला त्यांनी पत्रकारीतेचे गुरुकुल केले होते. परंतु अदानी कंपनीच्या हाती एनडीटीव्हीचा कारभार आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम राजीनामा दिला होता. सध्या त्यांनी रविश कुमार आॅफिशियल हे युट्युब चॅनेल सुरू केले आहे. या चॅनेलला सुमारे 80 लाख सबस्क्राईबर आहेत.

पत्रकार टीव्ही चॅनल सोडून युट्युबर का बनत आहेत?

Also Watch https://www.youtube.com/@ravishkumar.official

सध्याची परिस्थिती काय आहे?

पत्रकार टीव्ही चॅनल सोडून युट्युबर का बनत आहेत?

माध्यमांमध्ये सध्या खूप चिंतेचे वातावरण आहे. सत्ताधीशांविरोधात बातमी लिहीताना मालकांना विचारावे लागते अशी परिस्थिती काही चॅनल आणि वृत्तपत्रकारांची झालेली आहे. किंवा ती बातमी बॅलेन्स पद्धतीने लिहावी लागत आहे. ही एकप्रकारे व्यवस्थेशी तडजोड झाली आहे. काही पत्रकार ही तडजोड स्विकारत आहे. तर काहीजण यास थेट विरोध करत आपली पत्रकारितेची मुल्ये जपत आहेत. सत्ताधीशांच्या समर्थनार्थ असलेल्यांकडून त्यांच्यावर ट्विटर, फेसबुकद्वारे शिवीगाळ केली जाते. हे प्रकार पूर्वी कधीही पाहिले नव्हते. परंतु असे असतानाही सत्यमेव जयते म्हणत पत्रकारिता सुरूच आहे.

पत्रकार टीव्ही चॅनल सोडून युट्युबर का बनत आहेत?FAQ

पत्रकार कसे बनतात ?

पत्रकार बनण्यासाठी मास कम्युनिकेशन ची डिग्री उपलब्ध आहे. परंतु तुम्ही डिप्लोमा देखील करू शकता.

बोगस पत्रकारावर कारवाई होते का ?

बोगस पत्रकारांवर तुम्ही कारवाई करू शकतात. पोलीस ठाण्यात जाऊन तुम्ही त्यांच्यावर तक्रार देऊ शकता. अनेकदा ग्रामीण भागात काही बोगस पत्रकार लोकांना धमकावून खंडणी उकळत असतात. तुमही तक्रार केल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.

बोगस पत्रकार कसे ओळखावे?

पत्रकारांच्या वृत्तपत्राची नोंदणी जिल्हाधिकारी कार्यालयात असते. एखादा पत्रकारावर तुम्हाला संशय असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्याच्या नावाची, पेपर, channel ची नोंद आहे का ते तपासू शकता.

भारतात पत्रकारांना धोका आहे का ?

भारत हा लोकशाही देश आहे. त्यामुळे तुम्हाला कोणीही अडवू शकता नाही.

निष्कर्ष

 या पत्रकारांसह शेकडो पत्रकार आहेत. ज्यांनी प्रवाहापेका वेगळी वाट धरून यशस्वी झाले आहे. त्यामुळे भविष्यात पारंपारिक चॅनेलपेका युट्युब चॅनेलला अधिक महत्त्व प्राप्त होईल. याठिकाणी सरकारी हस्तकेप होईल का याबद्दल माहिती नाही. परंतु झाल्यास पुन्हा सच्चे पत्रकार नवी वाट शोधतीलच. [पत्रकार टीव्ही चॅनल सोडून युट्युबर का बनत आहेत?]

Read more: पत्रकार टीव्ही चॅनल सोडून युट्युबर का बनत आहेत?

1 thought on “पत्रकार टीव्ही चॅनल सोडून युट्युबर का बनत आहेत?”

Leave a Comment