Google layoffs in marathi | ए.आय.मुळे 2024 च्या नववर्षात पुन्हा Google आणि Amazon मधील नोकऱ्या धोक्यात

5/5 - (2 votes)

[Google layoffs in marathi] नववर्षच्या स्वागताचे आगमन नुकतेच झाले आहे. नव्या उमेद घेऊन अनेकजण वर्षाच्या प्रवासाला सुरूवात करू लागले आहेत. परंतु जगभरातील पहिल्या 10 क्रमांकामध्ये येणाऱ्या आणि आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग ठरलेल्या Google आणि Amazon कंपनीने एक मोठा झटका दिला. या कंपन्यांतील शेकडो कर्मचाऱ्यांना नववर्षाच्या सुरूवातीलाच नारळ दिला गेला आहे. हे सर्व घडत आहे एआय अर्थात आर्टिफिशीयल इंटेलेजन्समुळे. Google आणि Amazon मधील कंपन्या सरळ त्यांच्या कुशाग्र बुद्धीमत्ता असलेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यास सुरूवात केली आहे. एका रात्रीत कामगारांना एक मेल धडाडतो. आणि काही सेकंदात या कामगारांच्या पायाखालची वाळू सरकली. अनेकांनी याबाबत समाजमाध्यमावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. इतक्या मोठ्या कंपनीमध्ये अशी अवस्था असेल तर सर्वसामान्य कंपन्यांतील कर्मचाऱ्यांसमोर पुढे काय वाढून ठेवले आहे असा प्रश्न पडू लागला आहे. [Google layoffs in marathi]

Google layfalls in Marathi

what is A.I.

एआय म्हणजे काय [Google layoffs in marathi]

  • मागील चार पाच महिन्यांपूर्वी आपण एआय विषयी माहिती घेत असलो तरी एआय ही टेक्नोलॅाजी खूप जुनी आहे. प्रत्येकवेळी मानवाने यामध्ये आवश्यक बदल करून ते विकसित केले आहे. ज्या माणसाने एआयला जन्म दिला. तेच एआय आता मानवाच्या कामावर गदा आणू लागला आहे. समजा, तुमचा एक सराफाचा (ज्वेलर्स) व्यवसाय आहे. तुमच्या सोन्याची तुम्हाला जाहिरात किंवा विपणन करायचे आहे. तर, त्या जाहिरातीसाठी किमान पाच ते 10 लाख रुपये खर्च येतो. यामध्ये मॅाडेल, फोटोग्राफर, जिंगल तयार करणारा कलाकार आणावा लागतो. परंतु एआयमध्ये अवघ्या 100,200 रुपयांत किंवा टेक्नोलॅाजीची जान असल्यास मोफत सर्वकाही उपलब्ध होऊ शकते. तुम्हाला केवळ प्रॅाप्ट म्हणजेच, एआय सॅाफ्टवेअरला त्याच्या भाषेत सांगावणारे शब्द तयार करावे लागते. तुम्हाला नेमके काय हवे आहे. कशी मॅाडेल, कसे सोने घातले आहे, हे सांगावे लागते त्यानंतर तुमची मॅाडेल अवघ्या काही सेकंदात तुमच्यासमोर येईल. हा एआय अशा अनेक फिल्डमध्ये शिरला आहे. चित्रकार, न्यूज अँकर, कथाकार, चित्रपट, आयटी सेक्टर अशा अनेक विभागातील कामगारांच्या नोकऱ्या यामुळे धोक्यात आहेत. काही सायबर हल्लेखोरांकडूनही एआयचा वापर केला जात असून अनेकांचे फोटो मॅार्फ (फोटोमध्ये छेडछाड करणे) त्याद्वारे अश्लिल चित्रफित तयार झाल्याचे प्रकार उघड झाले आहेत. त्यामुळे हे एआय नोकऱ्यांसोबत आयुष्याचीही बरबादीचे कारण ठरू शकते. [Google layoffs in marathi ]

Read also – https://maharashtratechnology.com/patrakar-channel-sodun-youtuberbanaty/

गुगल आणि अमेझॅानमधील कामगारांना नव्या वर्षातच नारळ

  • Google ही कंपनी देशातील सर्वात मोठी कंपनी. उठल्यापासून ते झोपेपर्यंत गुगलशी आपला थेट संबंध येत असतो. युट्यूब पासून ते काही सर्च करायचे असेल माहिती गोळा करायची असेल तर गुगल शिवाय पर्याय नाही. या सिस्टीम मागे हजारो अभियंते, डिजीटल मार्केटर काम करत असतात. परंतु कंपनीने पैसे वाचविण्यासाठी नववर्षात शेकडो कामगारांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर Amazon कंपनीनेही त्यांच्या स्टुडियो डिव्हिजन आणि ट्विच या कंपनीतील कामगारांच्या कपातीचा निर्णय घेतला आहे. मागील दोन ते तीन वर्षांत Amazon कंपनीने आतापर्यंत 27 हजार कामगारांचे राजिनामे घेतले आहेत. मोठ्या कंपन्यांकडून कामगार कायदा सर्रास पायदळी तुडविला जात असल्याचे या प्रकारातून दिसून येत आहे. [Google layoffs in marathi] https://twitter.com/kevinb9n/status/1745890746350321818
Google Layoffs in Marathi

तुमच्या नोकऱ्या वाचवायच्या असल्यास काय कराल

  • भविष्यात सर्वच विभाागात एआय टेकनिकचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे ड्रायव्हरपासून ते घरकाम करणारी महिला, या सर्वांना या एआयचा फटका बसण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तुम्ही माहिती तंत्राजालामध्ये एक पाऊल पुढे असणे आवश्यक आहे. देशात काय सुरू आहे, याची माहिती तुम्हाला आवश्यक आहे. आपल्याला एआय सोबत आता जगावेच लागेल असा विचार करून तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर स्वतःसाठी करावा. तसेच नोकरी सोबत एखादा जोडधंदाही सुरू करावा जेणेकरून तुम्ही एआयच्या जाळ्यात अडकणार नाहीत. [Google layoffs in marathi ]

FAQ – [Google layoffs in marathi]

एआयमुळे नोकऱ्या धोक्यात आहेत का ?

होय, कारण तुम्हाला जर कोणतीही कला किंवा टेक्नोलॅाजीचे नॅालेज नसेल तर तुमच्यासाठी एआय हा धोक्याचा ठरू शकतो. परंतु जर तुम्हाला जर कला अवगत असेल तर जुने ते सोने ठरून नक्कीच तुम्ही यश गाठू शकता.

एआयला मिनिंग इन मराठी A.I. meaning in Marathi

एआय म्हणजेच आर्टिफिशियल इन्टेलेजेन्स. याला मराठीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतात. ही बुद्धिमत्ता मानवाची नसून केवळ संगणक तुम्हाला ती माहिती प्रोव्हाइट करतो. फोटोशॅाप, व्हिडीयो एडिटिंग, ध्वनीफित सर्वकाही तुम्हाला मिळेल. फक्त एक प्राँप्ट म्हणजेच, एआय सॅाफ्टवेअरला सूचना द्यावी लागते. म्हणून ती मानवी बुद्धिमत्ता ठरत नसून ती कृत्रिम असते. विशेष म्हणजे, सुरूवातीला कृत्रिम बुद्धिमत्तेला मानवच माहिती देत असतो. नंतर तो ती साठवून अपडेट करतो.

एआय भारतात बॅन  होईल का ?

एआयमुळे गेल्याकाही महिन्यात चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या अब्रूचे नुकसान झाले. विशेषतः अभिनेत्रींच्या चेहऱ्याचे मॅार्फ करून डिपफेकचा वापर केला गेला. या प्रकारामुळे संपूर्ण बॅालीवूड हादरले होते. याची दखल सरकारी पातळीवर घेण्यात आली आहे. राष्ट्रपतींनीही सावधानतेचा इशारा दिला आहे. असे असले तरी एआयला बॅन करण्यात आलेले नाही.

निष्कर्ष

ज्याप्रमाणे आपल्याला भविष्यात करोना सोबत जगावे लागणार आहे. त्याप्रमाणे आपल्याला एआय सोबत देखील जगावे लागणार आहे. करोनामुळे शारिरीक स्थिती ढासळते. परंतु एआयच्या आगमणाने अनेकांच्या नोकऱ्या गमावल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची मानसिक स्थिती ढासळत आहे. तुम्ही एखादी कला जोपासा. टेक्नोलॅाजीबद्दल माहिती नसल्यास ती टेक्नोलॅाजी शिकून घ्या. यातून एखादा व्यवसाय उभा करा. आता सुरूवात कराल तर तो व्यवसाय चार पाच वर्षांनी स्थिरावेल. त्यामुळे भविष्यात याच गोष्टी एआयवर मात करण्यासाठी हीच वेळ योग्य आहे. [Google layoffs in marathi]

Leave a Comment