नमस्कार मित्रांनो, maharashtra technology च्या नवीन blog वर तुमचे स्वागत आहे. आयफोन म्हटलं कि त्याचा वापरकर्त्याला एक वेगळं स्टेटस निर्माण झालेलं असत. आता आपल्या गाव खेड्यातही मोठ्या प्रमाणात आयफोन चे चाहते झाले आहे. अनेकजण त्यांचा आयफोन थोडा जरी जुना झाला कि लगेच तो विकून नवीन घेत असतात, गेल्या वर्षी apple ने आयफोन १४ लॉन्च केला होता. हा मोबाईल अजून विक्री होत असतानाच apple ने आता Iphone 15 बाजारात आणला आहे. गेल्या काही दिवसांपासून iphone 15 ची बाजारात मोठी चर्चा सुरु आहे. त्यामुळे iphone 15 ची अनेक apple iphone प्रेमी प्रतीक्षा करत आहेत. ती आता पूर्ण होणार आहे. तुम्हाला ब्लॉग आवडल्यास किंवा अभिप्राय कळवायचे असल्यास नक्की आम्हाला कॉमेंट करा आणि हा ब्लॉग तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांना share करा.
तुम्हाला Iphone 15 buy करायचा असेल तर हा ब्लॉग तुमची मदत करू शकेल. तुमचा आवडता Iphone 15 हा २२ सप्टेंबरला लॉन्च होईल. आयफोन १५ ची price किती आहे ? हा मोबाइल विकत घेणे फायदेशीर आहे का? हे आज आपण जाणून घेऊया.
Iphone 15 कसा आहे ?
आयफोन १५ मध्ये सर्वात मोठा बदल आहे, तो म्हणजे आयफोनच्या चार्जिंग केबल मधील बदल. आयफोनमध्ये तुम्हाला USB type C केबल पाहायला मिळेल. पूर्वी apple त्यांच्या मोबाइलला Lightning केबल वापरीत होते. हा चार्जर इतर मोबाइलला लागत नसल्याने या केबल खराब झाल्यावर त्याचे लवकर विघटन होत नव्हते. त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहचत होती. apple ने USB type C केबल चार्जरच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. आयफोन 15 मध्ये 6.1-इंचाचा OLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये आयफोन pro मॉडेल प्रमाणे ‘डायनॅमिक आयलंड’ सेल्फी नॉच आहे. उर्वरित फोन पूर्वीच्या मॉडेल सारखाच बनविण्यात आला आहे. ज्यामध्ये फ्रॉस्टेड ग्लास बॅकिंग पॅनेल आणि संपूर्ण परिमितीसह एक अॅल्युमिनियम डिसाइन आहे. यामध्ये फ्रॉस्टेड ग्लास बॅक वापरण्यात आला आहे. जो मागील मॉडेलमध्ये वापरल्या गेलेल्या ग्लॉसी एलिमेंटपेक्षा खूपच आकर्षक दिसतो.
कॅमेरा
नवीन iPhone 15 मध्ये 48 MP चा मुख्य कॅमेरा आहे. हे पूर्वी फक्त प्रो मॉडेल्सवर उपलब्ध होते. 48 MP मुख्य कॅमेरा व्यतिरिक्त, iPhone 15 मध्ये 12MP अल्ट्रावाइड लेन्स आणि 12MP सेल्फी कॅमेरा देखील आहे.
बॅटरी लाईफ
आयफोन १५ ची बॅटरी लाईफ आयफोन १२ पेक्षा तीन तास जास्त टिकू शकते. व्हिडीओ पाहिल्यास दिवसभरात सुमारे २० तास बॅटरी टिकेल असा दावा apple ने केला आहे. इफोने ची बॅटरी परफॉर्मबद्दल अनेकजण वर्षानुवर्षे नाराजी व्यक्त करतात.
आयओएस बद्दल
आयफोन १५ मध्ये ios -१७ सॉफ्टवेअर असेल. यामध्ये तुम्ही तुमचे कॉल कस्टमाइज करू शकता. म्हणजे एखाद्या व्यक्तीस तुमचा कॉल अथवा मेसेज गेल्यास तुमची फोटो त्यावर दिसू शकेल.
किंमत किती असेल ?
मुख्य म्हणजे आयफोन १५ ची किंमत किती असेल हा प्रश्न अनेकांना पडला आहे. आयफोन च्या बेस व्हेरियंटची price ७९,९०० रुपये इतकी आहे.
निष्कर्ष
तुम्हाला हा ब्लॉग आवडला असल्यास नक्की कॉमेंट करा. जर तुम्ही Iphone विकत घेणार असल्यास विचार करून खरेदी करा. iphone १५ शिवाय तुम्हाला १३, १४ प्लस देखील चांगले ऑपशन आहेत. तुम्हाला आयफोन १५ ची price किती आहे ? ह्याची माहिती मिळाली. ज्यांना दर वर्षाला मोबाईल बदल करण्यास आवडते. त्यांनी iphone १५ घेण्यास हरकत नाही.
FAQ
१) आयफोन १५ ची भारतात काय price आहे ?
– आयफोन १५ ची भारतात ७९,९०० रुपये किंमत आहे. तसेच iphone १५ प्रो ची किंमत १ लाख ३४ हजार ९०० रुपये आहे. हि किंमत बेस व्हेरियंटची आहे.
२) भारतात आयफोन १५ केव्हा लॉन्च होईल ? – भारतात आयफोन १५ २२ सप्टेंबरला लॉन्च होईल. याची प्रि ऑर्डर apple कडून सुरु झाली आहे.
३) आयफोन १५ प्रो मॅक्स केव्हा लॉन्च होईल ? – भारतात आयफोन १५ प्रो मॅक्स अद्याप apple ने लॉन्च केला नाही. नोव्हेंबर पर्यंत हा फोन भारतात येऊ शकतो.
४) आयफोन १५ चा कॅमेरा किती आहे.
– आयफोन १५ चा कॅमेरा ४८ मेगापिक्सेल आहे. तर सेल्फी कॅमेरा १२ मेगापिक्सेल आहे. आयफोन चे कॅमेरे इतर मोबाईलच्या तुलनेत बेस्ट असतात, त्यामुळे या कॅमेऱ्यात तुम्हाला चांगले फोटो क्लीक करता येतील.
५) आयफोन १५ ची बॅटरी लाईफ काय आहे ?
– आयफोन १५ ची बॅटरी लाईफ दिवसभर टिकू शकते अशी आहे. २० तास आपण व्हिडिओ पाहू शकतो असा दावा apple ने केला आहे.
1 thought on “iphone 15 price in india – आयफोन १५ ची price किती आहे ?”