[Second Hand iphone buy online] आयफोन घेण्याचे स्वप्न अनेकांचे असते. परंतु मागील काही वर्षांमध्ये आयफोनच्या किमती वाढल्या आहेत. काही आयफोन तर एक ते दीड लाख रुपयांच्या घरात आहेत. असे असले तरी मोबाईल ही अशी वस्तू आहे. जिची किमंत दर महिन्याला कमी-कमी होत असते. वापरकर्ता जर चांगला वापरकर्ता असेल तर मोबाईल चार ते पाच वर्ष टिकतो. परंतु काही वापरकर्त्यांकडे अवघ्या एक ते दोन वर्ष देखील मोबाईल टिकत नाही. अनेकदा रेल्वे, बस प्रवासामध्ये मोबाईल चोरीच्या घटना देखील घडतात. किंवा खिशातून मोबाईल पडतो. त्यामुळे मोठे नुकसान होत असते. हे टाळण्यासाठी गेल्याकाही वर्षांत नवा मोबाईल खरेदी करणे टाळत काहीजण जुने, रिफर्बिश (जुना मोबाईल दुरुस्त करून नव्याने विक्रीला ठेवलेला) खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. त्यात आयफोन खरेदी करण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या ब्लाॅगमध्ये आपण जुने आयफोन मोबाईल खरेदी विक्री करणाऱ्या काही वेबसाईट, ॲप आणि मुंबईतील होलसेल मार्केटची माहिती. [Second Hand iphone buy online]
सेकंड हँड आयफोन का घ्यावा
- जगभरात मोबाईलची मागणी वाढली आहे. त्यामुळे ॲपल, सॅमसंग तसेच चायनिज मोबाईल कंपन्या दर पाच ते सहा महिन्यांनी नव्याने मोबाईल बाजारात आणत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य खरेदीदार नेहमी कन्फूज असतो. नव्याने मोबाईल घ्यावा की, सेकंड हँडला प्राधान्य द्यावे. ॲपलकडून लाखो रुपयांच्या मोबाईलचा मारा होत असतो. त्यामुळे आयफोन खरेदी करणे सर्वसमान्यांच्या खिशाला परवडत नसते. हे पैसे वाचविण्यासाठी नक्कीच सेकंड हँड आयफोनलला प्राधान्य द्यावे. बार्केनिंग करणे शक्य असल्यास अर्ध्या किमतीतही तुम्हाला मोबाईल मिळू शकतो. [Second Hand iphone buy online]
आयफोन खरेदी करताना काय काळजी घ्यावी
- सेकंड हँड आयफोन घेताना शक्यतो परिचित व्यक्ती कडून घ्यावा. जर olx किंवा इतर ऑनलाईन वेबसाईटवरून घेत असाल तर त्याचे फोटो मागवून घ्या. एखाद्या शाॅपमधून खरेदी करत असाल तर त्या आयफोनवर किमान तीन ते सहा महिने वाॅरंटी मागा.
- आयफोन चारही दिशेकडून व्यवस्थित तपासा. डिस्प्लेचा भाग हलका वर आला असेल तर किंवा वाकडा (बेंड) झाला असेल तो घेणे टाळा.
- आयफोनची बॅटरी हेल्थ किमान 80 टक्के असावी. 80 हून कमी असल्यास तो घेणे टाळा.
- आयफोन 7, 8, 10, 11, 12 या मोबाईलच्या किमती मोठ्याप्रमाणात उतरल्या आहेत. आयफोन 7 तुम्ही 8 ते 10 हजारपर्यंत घेण्याचा प्रयत्न करा. तर 12 हा साधारण 30 ते 32 हजार पर्यंत घ्यावा. 11 हा 20 ते 22 हजार, 10 हा 13 ते 18 हजार आणि 8 कमीत कमी 11 ते 12 हजारापर्यंत खरेदी करावा.
- काही नागरिकांचे मोबाईल फोन अनेकदा चोरीला जातात. जर तुम्हाला मोबाईलबद्दल शंका असेल, तर तुम्ही केंद्र सरकारच्या CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलवर मोबाईलचा IEMI क्रमांक टाकून त्याची माहिती तपासू शकता. जर तुम्हाला मोबाईलचा IEMI नंबर हवा असेल तर तुम्ही मोबाईलच्या सेटिंग्जमध्ये किंवा त्या मोबाइलच्या कीपॅडवर *#06# डायल करून ते तपासू शकता.
- ओएलएक्सवर आयफोन घेत असाल तर ऑनलाईन पेमेंट करणे टाळा. एकही रूपयाचे ऑनलाईन पेमेंट करू नका. कारण काही फ्राॅड लोक त्यांच्या खात्यात पैसे टाकण्यास सांगून तुमची फसवणूक करू शकतात. त्यामुळे समोरा-समोर भेटून मोबाईल घ्यावा.
- आयफोन 11, 12, 13 किंवा त्यापुढील चे माॅडेल घेताना शक्यतो बिल, मोबाईल बाॅक्स मागून घ्या. शाॅपमधून खरेदी करताना शाॅपचे बिल घ्या. तसेच खासगी व्यक्तीकडून खरेदी करताना त्या व्यक्तीचे आधार कार्डची प्रत (फोटोकाॅपी) मागून घ्या. [Second Hand iphone buy online]
हे ही वाचा : https://maharashtratechnology.com/whatsapp-backup-from-android-to-iphone/
या आहेत बेवसाईट | Second Hand iphone buy online
- मोबाईल गो – मोबाईल गो या वेबसाईटवर तुम्हाला आयफोन, अँड्रोईड मोबाईल खरेदी करता येऊ शकतात. या बेवसाईटवरील काही मोबाईलवर तुम्हाला वाॅरंटी देखील दिली जाते. मोबाईल लेटेस्ट माॅडेलचा असेल तर ॲपल किंवा ज्या कंपनीचा मोबाईल आहे. त्या ब्रँडची वाॅरंटी देखील मिळते. येथे इएमआयवर म्हणजे, सुलभ हप्त्यावर मोबाईल घेता येतो.
- ओवनटिका – ओवनटिका या कंपनीची वेबसाईट आणि ॲप उपलब्ध आहे. यावरून तुम्ही मोबाईल खरेदी करू शकता. परंतु यावर काही प्रमाणात महाग फोन मिळू शकतात.
- सेलबडी – सेलबडी हे मोबाईल ॲप आहे. या कंपनीचे मुंबईमध्ये शाॅप आहे. येथे तु्म्हाला आयफोन 5 पासून मोबाईल उपलब्ध होतील. काही नागरिकांना या शाॅपचे चांगले अनुभव आले आहेत. पण काही जणांना वाईट देखील अनुभव आले आहेत.
- मास्टर फोन – मास्टर फोन हे आयफोनसाठी फेमस शाॅप आहे. याची एक शाखा मुंबईत तर दुसरी शाखा हैदराबादमध्ये आहे. येथे तुम्हाला युएस वेरियंटचे मोबाईल मिळतील. येथे सेकंड हँड नव्हे तर अमेरिकेतील माॅलमधील डेमो मोबाईल तुम्हाला उपलब्ध होतील.
- कॅशिफाय– कॅशिफाय ही देशातील सेकंड हँड आय़फोन तसेच इलेक्ट्राॅनिक वस्तू विकणारी मोठी कंपनी आहे. या कंपनीची वेबसाईट आणि ॲप उपलब्ध आहे. येथे तुम्ही होलसेल आणि रिटेल दोन्ही पद्धतीने मोबाईल खरेदी करू शकता.
- इंद्रप्रस्थ- इंद्रप्रस्थ हे मोबाईल आणि इलेक्ट्राॅनिक वस्तूंसाठी होलसेल मार्केट आहे. येथे तुम्हाला स्वस्तात आयफोन मिळेल. परंतु त्याचे पार्ट बदललेले असू शकतात. त्यामुळे याठिकाणी एखाद्या जानकाराला तुम्ही घेऊन जा. हे मार्केट बोरीवली रेल्वे स्टेशनच्या बाजूला आहे.
- दिल्ली आणि कोलकत्ता- दिल्लीतील नेहरू मार्केट तसेच कोलकत्ता मार्केटमध्ये स्वस्तात मोबाईल मिळू शकेल. [Second Hand iphone buy online]
FAQ– Second Hand iphone buy online
सेकंड हँड आयफोन घेणे सुरक्षित आहे का ?
होय, नक्कीच सुरक्षित आहे. परंतु ज्या व्यक्तीकडून आपण आयफोन खरेदी करत आहोत. तो शक्यतो परिचित असावा. एखाद्या शाॅपमधून आयफोन घेत असाल. तर त्या व्यक्तीकडून बील आणि बाॅक्स घ्यावा. शक्यतो अनोळखी व्यक्तीकडून मोबाईल घेणे टाळा.
भारतात ऑनलाईन सेकंड हँड मोबाईल मिळू शकतो का ?
होय, भारतात अनेक ऑनलाईन कंपन्या आहेत. ज्या सेकंड हँड मोबाईल विकत असतात. यामध्ये काही नामांकित कंपन्यांचाही सामावेश आहे.
ऑनलाईन मोबाईल खरेदी करताना काय काळजी घ्यावी ?
ऑनलाईन मोबाईल खरेदी करताना ती कंपनी ट्रस्टेड असावी. तसेच त्या कंपनीचे रिव्ह्यूव चेक करावेत. कंपनीकडून वाॅरंटी मिळते का ते पाहणे. ऑनलाईन खरेदी करताना सुरुवातीला पूर्ण पैसे देऊ नये. घरपोच मोबाईल आल्यानंतरच पूर्ण पैसे द्यावेत. मोबाईल हातात आल्यावर तो सर्व प्रथम चेक करावा.
निष्कर्ष
सेकंड हँड आयफोन खरेदी करणे चांगले आहे. त्यामुळे पैशांची बचत शकतो. तसेच अनेक कंपन्या आता सेकंड हँड मोबाईल विकू लागले आहे. भविष्यात सेकंड हँड मोबाईलचे मोठे मार्केट तयार होणार आहे.