WhatsApp backup from Android to iPhone

4.9/5 - (15 votes)

WhatsApp backup from Android to iPhone म्हणजेच, आपल्या नव्या आयफोनमध्ये अँड्राॅईन मोबाईलमधील व्हाॅट्सअॅप डेटा कसा ट्रानस्फर करावा हे शिकणार आहोत. नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे नव्या लेखात. तुम्हाला लेख आवडल्यास जरूर शेअर करा. 

Whatsapp backup from Android to iphone

अॅपल घेण्याकडे लोकांचा कल का वाढत आहे ? 

मागील काही वर्षांपासून अॅपल आयफोन खरेदीमोठ्याप्रमाणात होत आहे. याचे एकमेव कारण म्हणजे, बँकेचे सुलभ हप्ते. अॅपल आयफोन आता स्वस्त झाल्याने तसेच सुलभ मासिक हप्ते उपलब्ध झाल्याने अनेकजण अॅपल आयफोन विकत घेऊ लागले आहेत. त्यामुळे एेकेकाळी सॅमसंग, नोकियाचे मोबाईल वापरणाऱया तरूण भारतीयाच्या हातात आता अॅपल आयफोन मोबाईल दिसू लागला आहे. अगदी 11 वी ते 12 वी मध्ये नवख्या काॅलेजवयीन मुलांच्याही हातात 50 हजाराराचा आयफोन दिसू लागला आहे. त्यामुळे स्टेटस सिमबाॅल असलेला हा मोबाईल आता आपल्यासाठी साधारण बाब झाली आहे. [WhatsApp backup from Android to iPhone]

आयफोन का घेतात ? 

आयफोन हा अँड्राॅईडपेक्षा सुरक्षेच्या दृष्टीनेअधिक सुरक्षित आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांपासून ते पोलीस, अधिकारी सर्वच जन आयफोनचे चाहते आहेत. आयफोन खरेदी केल्यानंतर काय अडचणी येतात. आयफोन खरेदी केल्यानंतर त्याचे सेट अप करण्यापासून ते त्यामधील सेटींग, काॅन्टॅक्ट लोड करण्यापासून अनेक अडचणी येतात. त्यातील महत्त्वाची अडचण म्हणजेच, WhatsApp backup from Android to iPhone ही आहे. अनेकदा व्हाॅट्सअॅप डेटा आपल्याला आयफोनमध्ये संकलित करता येत नाही. त्यामुळे हा डेटा नेमका कसा संकलित किंवा रिस्टोर कराल हे आपण आज जाणून घेऊ.

Read Also : iphone 15 price in india 

असा कराल डेटा संकलित 

तुमचे WhatsApp संदेश Android वरून अॅपल आयफोनमध्य टाकण्यासाठी  तुम्हाला काय आवश्यक आहे ?

1)   Android फोनची आॅपरेटिंग सिस्टिम (म्हणजे तुमचे मोबाईल अपडेट) 5- lollipop किंवा त्यावरील असणे आवश्यक आहे. तर आयफोन मध्ये iOS सिस्टिम 15.5 किंवा त्यावरील असावी.

2)   WhatsApp तुमच्या Android वर 2.22.7.74 किंवा त्यावरील अपडेट असावे.

3) आयफोनवर WhatsApp 2.22.7.74 किंवा त्यावरील अपडेट केलेले असवा. 

4)   तुम्ही दोन्ही मोबाईलवर सेम फोन नंबर वापरणे आवश्यक आहे.

WhatsApp backup from Android to iPhone

5)  Move to iOS अॅप तुमच्या Android फोनवर इंस्टॉल केलेले असणे आवश्यक आहे.

6)  तुमचा आयफोन शक्यतो नवीन असावा किंवा फॅक्टरी सेटींगमध्ये रिस्टोर असावा.  

7) डेटा ट्रान्सफर करताना  दोन्ही मोबाईल एकाच Wi-Fi  नेटवर्कशी कनेक्ट केलेले असणे आवश्यक आहे किंवा Android डिव्हाइस iPhone च्या हॉटस्पॉटशी कनेक्ट केलेले असणे आवश्यक आहे.

 8)   Google Play Store वरून Move to iOS  हे अॅप डाउनलोड करा आणि ते तुमच्या Android फोनवर इंस्टॉल करा.

9)   तुमच्या नवीन (किंवा फॅक्टरी रीसेट) ‍आयफोनसाठी सेटअप प्रक्रिया सुरू करा. अॅप्स आणि डेटा सेटअप स्क्रीनवर जा आणि Android वरून डेटा निवडा.

10)   तुमच्या Android फोनवर Move to iOS अॅप उघडा आणि ऑनस्क्रीनवरील सूचना फॉलो करा. तुमच्या ‘iPhone’ वर एक कोड दिसेल.

11)  तुमच्या Android फोनवर कोड एंटर करा आणि तुम्हाला ट्रान्सफर डेटा स्क्रीनवर नेले जाईल.

12) व्हाट्सअॅप निवडा आणि नंतर स्टार्ट वर टॅप करा. हे तुमचा WhatsApp डेटा एन्क्रिप्ट करते आणि डेटा पाठविण्याची प्रक्रिया सुरू करते. तुम्ही Android वरील तुमच्या WhatsApp खात्यातूनही आपोआप साइन आउट व्हाल.

13)   तुमचा आयफोन पूर्णपणे सेट झाल्यावर, अॅप स्टोअरवरून नवीन WhatsApp डाउनलोड करा आणि त्याच फोन नंबरने साइन इन करा. तुम्ही WhatsApp iOS 2.22.10.70 किंवा त्यावरील अपडेट नसल्यास अडचणी येण्याची शक्यता आहे. 

तर अशापद्धतीने तुम्ही अॅपलमध्ये तुमचा WhatsApp डेटा आयफोनमध्ये साठवू शकता. ही माहिती आपल्याला आवडल्यास जरूर मित्रांना शेअर करा. 

WhatsApp backup from Android to iPhone – FAQ

व्हाॅट्सअॅप डेटा चोरला जाऊ शकतो 

व्हाॅट्सअॅफ डेटा चोरला जाऊ शकतो. याबद्दल सध्या तरी सांगू शकत नाही. परंतु एखाद्या थर्ड पार्टि अॅपच्या माध्यमातून आपण डेटा ट्रान्सफर करत असाल तर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तात्काळ तो डिलीट करा. त्यामुळे काही प्रमाणात तुमचा डेटा चोरला जावू शकत नाही.

व्हाॅटसअॅप डेटा आयफोनवर सिक्युर आहे का 

-व्हाॅट्सअॅप डेटा आयफोनवर सिक्युर आहे. परंतु तुम्ही काळजी घेणे आवश्यक आहे. 

आयफोन अॅंड्राॅईडहून सोपा आहे का

आयफोन तुम्ही एकदा वापरण्यास सुरूवात केली तर तुम्हाला अँड्राईड मोबाईल हातात घेणेही पसंत होणार नाही. आय़फोन वापरण्याची एक वेगळी मजा असते. 

निष्कर्ष

तुम्ही नवीन आयफोन घेतल्यास ज्या दुकानात तुम्ही आयफोन घ्याल त्यालाही सांगा डेटा ट्रान्सफर करायला. ते देखील करून देऊ शकतात. पण आॅनलाईन मोबाईल खरेदी केल्यास तुम्हाला वरील प्रक्रिया करावीच लागेल.