- [Who is Youtuber Kelly Korea ?] अतिथी देवो भवः म्हणजे, पाहुणा हा देवा स्वरूपात असतो असे आपली भारतीय संस्कृती म्हणते. महिलांचा आदर करणारे हेच आपल्याला शिकविले आहे. परंतु हे आता कागदावरच किंवा म्हणण्यापूरत मर्यादीत आहे का हा प्रश्न पडू लागला आहे. कारण काही दिवसांपूर्वीच साऊथ कोरियामधून भारतात फिरण्यासाठी आलेल्या प्रसिद्ध युट्युबर ‘केली’ हिच्यासोबत राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात विचित्र घटना घडली. पुण्यातील एका विक्रेत्याने ‘केली’ हिच्या गैरकृत्य केले आहे. याप्रकारावेळी ‘केली’ हिने प्रसंगावधान राखत तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार तिच्या युट्युब चॅनेलवर तिने अपलोड केला आहे. व्हिडीओ प्रसारित झाल्यानंतर सोशल मिडीयावर संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्रासोबत पुण्यातील सांस्कृतिक वारशाला धक्का बसला आहे. कोण आहे ‘केली’ आणि काय झाले होते तिच्यासोबत जाणून घेऊ. [Who is Youtuber Kelly Korea ?]
कोण आहे ‘केली-कोरिया’
- Who is Youtuber Kelly Korea ? ‘केली’ ही साऊथ कोरियाची एक प्रसिद्ध युट्युबर आहे. 2016 मध्ये तिने @kellykorea हे युट्युब चॅनेल सुरू केले होते. या चॅनेलच्या माध्यमातून ती विदेशामध्ये फिरून तेथील देशाची वेशभूषा, राहणीमान, खाद्य संस्कृती, पर्यटनस्थळे जगासमोर आणत असते. काही दिवसांपूर्वीच ती फिलीफीन, मलेशिया या सारख्या देशातील शहरांमध्ये फिरली आहे. तिच्या फक्त 115 व्हिडीओमध्येच 1 लाख 64 हजारहून अधिक सबस्क्राईबर झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच ती भारतात आली होती. त्यावेळी तिच्यासोबत हा प्रसंग झाला.
त्या दिवशी नेमके काय झाले ?
- पुण्यातील एका मार्केटमध्ये ‘केली’ही युट्युब व्लाॅग बनविण्यासाठी गेली होती. त्यावेळी एका विक्रेत्यासोबत बोलत असताना त्या विक्रेत्याने तिच्या खांद्यावर हात ठेऊन फोटो काढला. त्यावेळी ‘केली’ हिचा व्लाॅग सुरूच होता. ‘केली’ ही विदेशातून असल्याने काही नागरिक त्याठिकाणी गोळा झाले. त्यावेळी दुसरा एक व्यक्ती फोटो काढा असे म्हणू लागला. त्यानंतर पुन्हा तो विक्रेता तिच्याजवळ आला. त्याने तिचा गळा हाताच्या कोपऱ्या पासून पकडला आणि असा फोटो काढायचा असतो असे म्हणू लागला. या प्रकारामुळे ‘केली’ भांबावली. परंतु तिने प्रसंगावधान राखत, नमस्ते म्हणली आणि स्वतःची त्याच्या तावडीतून सोडवणूक केली. काही अंतरावर आल्यानंतर आपल्याला येथून पळायला हवे असे म्हणत ती तेथून निघून गेली. [Who is Youtuber Kelly Korea ?]
समाजमाध्यमावर तीव्र प्रतिक्रिया
- ‘केली’ हिने हा व्हिडीओ युट्युबवर प्रसारित केला. तसेच तिच्या व्हिडीओमधील थमनेलला (दर्शक छायाचित्राला) त्या व्यक्तीचा गळा पकडतानाचा फोटो ठेवला होता. हा व्हिडीओ पाहताच समाजमाध्यमावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. ‘केली’ हिच्याबद्दल झालेल्या गैरवर्तणुकीबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली. तर काही भारतीय सबस्क्राईबर लोकांनी काॅमेंट बाॅक्समध्ये घडलेल्या प्रकाराबाबत तिची माफी मागितली आहे.
- Watch also- https://maharashtratechnology.com/patrakar-channel-sodun-youtuberbanaty/
यापूर्वीही युट्युबर सोबत झाले आहेत छेडछाडीचे प्रयत्न
- यापूर्वी देखील काही असभ्य नागरिकांमुळे अनेक विदेशी युट्युबर, पर्यटकांना वाईट अनुभव आला आहे. सुमारे वर्षभऱापूर्वी मुंबईच्या खारमध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग करणाऱ्या एका कोरियन महिलेचा विनयभंग झाला होता. त्या तरूणांनी महिलेला चुंबन घेतले होते. संबंधित व्हिडीओ वायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यामुळे खार पोलिसांनी स्वत: कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दोन्ही मुलांना अटक केली होती.
- एप्रिल 2023 मध्ये राजस्थानमधील जोधपूर भागात एक कोरियन युट्युबर फिरण्यासाठी आली होती. ती मुलगी येथील संस्कृतीचे चित्रीकरण टिपत असताना येथील पचेटिया या भागात ती पोहचली. त्यावेळी एक तरूण तिच्या दिशेने आला. त्या तरूणाने तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. घाबरलेल्या त्या युट्युबरने तात्काळ तेथून पळ काढला. परंतु त्याने तिचा पाठलाग सुरूच ठेवला. पुन्हा तिच्यासोबत त्याने अश्लील कृत्य केले. त्यानंतर पुढे गेल्यावर महिलेने तो व्हिडीओ समाजमाध्यमावर प्रसारित केला. तसेच राजस्थान पोलिसांनाही तो टॅग करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तरूणाला ताब्यात घेऊन अटक केली.
- जून 2023 मध्ये पेड्रो मोटा हा डच युट्युबर भारत भ्रमंतीसाठी आला होता. बंगळूरूमधील एका चोर बाजाराचे चित्रीकरण करत असताना अचानक एका व्यक्तीने पेड्रोला अडविले. त्याचा हात पकडून व्हिडीओ का काढतोस असा जाब विचारण्यास सुरूवात केली. तसेच त्या व्यक्तीने पेड्रोला धक्काबुक्की करण्यास सुरूवात केली. अखेर पेड्रोने तेथून पळ काढला. याबाबत बंगळुरू पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली.
- दोन महिन्यांपूर्वीच दिल्लीमध्ये एका रशियन युट्युबरसोबत छेडछाड झाली होती. दिल्लीच्या सरोजिनी नगर मार्केटमध्ये रशियन युट्युबरसोबत गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. रशियन महिलेचे भारतात कोको नावाचे चॅनेलही आहे. ज्या दिवशी ही घटना घडली, कोको तिच्या चॅनलवरून लाइव्ह करत होती. तेवढ्यात एक मुलगा तिच्यासोबत चालू लागला. त्यानंतर त्याने त्या युट्युबरसोबत संवाद साधण्यास सुरूवात केली. काहीवेळाने त्याने महिलेसोबत बदमाशी करण्यास सुरूवात केली. तसेच तु मला आवडतेस, काही अश्लील शेरेबाजी करत तिच्यासोबत मैत्री करण्याचा हट्ट धरला.
FAQ– Who is Youtuber Kelly Korea ?
विदेशी लोक भारतात पर्यटनासाठी का येतात ?
भारतात विविध जाती, धर्माचे लोक राहतात. प्रत्येक जाती धर्माची संस्कृती वेगवेगळी आहे. हा अनुभव विदेशींसाठी खूप निराळा असतो. त्यामुळे भारतीयांची संस्कृती समजून घेण्यासाठी लोक भारतात येत असतात.
विदेशी पर्यटक, युट्युबर महिलांची छेडछाड होण्याचे प्रमाण का वाढले आहे ?
भारतात येणारे पर्यटक हे विदेशी असल्याने अनेकदा समाजकंटकांवरही ते डोळे झाकून विश्वास ठेवतात. परंतु याचा गैरफायदा त्या व्यक्ती घेतात. त्यामुळे हे प्रकार वाढीस लागले आहे. काही पर्यटक हे युट्युबर असल्याने प्रकार जनतेसमोर उघड झाले. अन्यथा पोलिसांचा फेरा टाळण्यासाठी विदेश लोक पोलिसात तक्रारी देत नाहीत. अनेक प्रकार तेथेच मिटविले जातात.
भारतात आदरतीथ्य मिळते
- या घटना लज्जास्पद असल्या तरी भारतात बहुतांश ठिकाणी चांगले आदरतीथ्य मिळते असा दावा विदेशातील युट्युबर करतात. अनेक युट्युबर भारतात फेरफटका मारण्यासाठी आजही येत असतात. मुंबईतील फोर्ट, आझाद मैदान, मरीन लाईन्स, नरिमन पाॅईंट, जुहू भागात हजारो विदेशी पर्यटक तुम्हाला दिसतील. केवळ काही समाजकंटकांमुळे देशाच्या प्रतिमेला काळीमा लागत असतो.
निष्कर्ष
- विदेशी पर्यटक आल्यास शक्यतो त्यांना त्रास देऊ नका. गेटवे ऑफ़ इंडिया परिसरात अनेकजण विदेशी पर्यटकांसोबत फोटो काढण्यासाठी त्यांचा पाठलाग करतात. असे करणे टाळा. कारण तुमच्यासोबत आपल्या भारताची प्रतिमाही त्यामुळे मलीन होत असते. त्यांना भारतातील संस्कृतीची माहिती द्या. त्यांना पर्यटनासाठी लागणाऱ्या ठिकाणांची माहिती द्या. तु्म्ही त्यांचा आदर केल्यास ते स्वतः तुमच्यासोबत फोटो काढतील आणि तुमच्याबद्दल त्यांच्या मित्रांनाही माहिती देतील. यातून तुमच्यासोबत देशाचे नाव आणखी उंचावेल. [Who is Youtuber Kelly Korea ?]